सुरेगाव येथे कापूस आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली!!

Dec 11, 2025 - 14:26
 0  8
सुरेगाव येथे कापूस आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली!!

दैनिक जागर मराठी


औंढा नागनाथ:कापूस आंदोलनामधील गोळीबारामध्ये १९८६ साली वीरमरण पत्करलेल्या शेतकऱ्यांना औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे बुधवारी (ता. दहा) सकाळी नऊ वाजता आदरांजली वाहण्यात आली.तत्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कापसाला भाव वाढ मिळावी म्हणून आंदोलन झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना वीरमरण आले. गोळीबारात सुरवाडी येथील ज्ञानदेव टोम्पे, डिग्रस येथील परसराम कऱ्हाळे, निवृत्ती कऱ्हाळे या तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. तर आंदोलनात सहभागी ५५ शेतकऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली. शंभरपेक्षा अधिक शेतकरी गोळी लागल्याने जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शेतमालाला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. परंतु, आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. तेव्हा आणि आजही शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासाठी दर मिळवण्यासाठी झगडावेच लागत आहे. सुरेगावचे १९८६ मधील हे आंदोलन अंगावर शहारे आणणारे आहे. आंदोलनात गोळीबार केल्याने यात वीरमरण पत्करलेल्या तीन शेतकऱ्यांना आजही शेतकरी विसरू शकला नाही. दहा डिसेंबर रोजी या तीन वीरमरण आलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उत्तमराव वाबळे,खंडबाराव पोले, अँड प्रदीप पोले, सरपंच माधव पोले, खंडबाराव नाईक, भाऊराव शिंदे, कानबाराव तात्या पोले ,चंपतराव पोले, बबनराव दिंडे, सदाशिव पारडे, चंपतराव पोले ,बळीराम क-हाळे, विश्वनाथ देशमुख, पांडुरंग लांडगे, विठ्ठलराव देशमुख, राजाभाऊ गोरे, देविदास लांडगे ,गोपीनाथ गुंजावळे, त्र्यंबक सावंत, शेषराव राखोडे, राजू कऱ्हाळे, सर्जेराव दिंडे ,बालासाहेब पोले ,बाबुराव पोले, प्रभाकर पोले, वसंतराव पोले, सखाराम पोले, वसंत पोले ,नागू पोले, मंगेश पोले, कृष्णा पोले ,सदाशिव पारडे, गुलाबराव पाटील ,बाळासाहेब पोले, रामराव सोळंके, मारोती सावळे, सुभाषराव पोले, गुलाबराव पोले, पिराजी पावडे, तौफिक कुरेशी ,कुबेर पोले, गंगाधर पोले, ज्ञानेश्वर पोले,किशन टोम्पे, शिवाजी टोम्पे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी पोलिस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकाळ,सुभाष जैताडे ,यशवंत गुरुपवार,अमोल चव्हाण यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
औंढा नागनाथ : तालुक्यातील सुरेगाव येथे कापूस आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.(छाया:-दताञय शेगुकर, औंढा नागनाथ)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow