शेअर बाजाराची काय राहील चाल; दोन चिंताजनक घडामोडी, अनेकांच्या काळजात धस्स, काय होणार पुढे?
मुंबई : भारतीय शेअर मार्केटमध्ये चढ-उताराचा खेळ सुरूच आहे. मागील काही महिन्यात देशांतर्गत बाजारात मोठी पडझड झाली तर गेल्या तीन दिवसांपासून बाजारात खरेदी होताना दिसत आहे. बाजारातील गोंधळाच्या परिस्थितीत आता गुंतवणूकदारांच्या नजरा दोन प्रमुख घडामोडींवर खिळल्या आहेत. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आणि आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठकीचा समावेश आहे.उच्च मूल्यांकन, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) मोठ्या प्रमाणात विक्री, कमकुवत उत्पन्न आणि आव्हानात्मक जागतिक आर्थिक दृष्टिकोन हे सर्वकाही देशांतर्गत बाजारातील अस्थिरतेसाठी कारणीभूत ठरली आहेत. बीएसई500 निर्देशांकातील तब्बल ४०० हून अधिक शेअर्स मंदीच्या विळख्यात सापडले आहेत तर, जवळजवळ २०० शेअर्सचे मूल्य एक तृतीयांश कमी झाले. त्याचवेळी, ९५ शेअर्स ४०% पर्यंत खाली आले असून सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी (SPARC) चे शेअर्स सर्वाधिक ६५% आपटले आहेत. अशा स्थितीत, या येत्या काही दिवसांत या दोन घडामोड बाजाराची दिशा ठरवतील.
What's Your Reaction?








