सम्राट सुरवाडे यांनी केली गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी...!

Nov 1, 2024 - 17:10
 0  546
सम्राट सुरवाडे यांनी केली गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी...!
सम्राट सुरवाडे यांनी केली गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी...!

दै. जागर मराठी 

प्रतिक कुऱ्हेकर.

मूर्तिजापूर :- येथील घरकुल परिसरात राहणाऱ्या गोर गरीब मुलांसोबत एक दिवस घालवून सम्राट सुरवाडे यांनी सपत्नीक त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे दिवाळी निमित्य त्यांच्यासाठी गोड-धोड व फटाके देऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावलंय.  AIMIM चे उमेदवार सम्राट सुरवाडे व त्यांच्या परिवाराने दिवाळी निमित्य धन्या धांडग्यांना भेटण्याऐवजी मूर्तिजापूर शहरातील व काही ग्रामीण विभागातील गावात जाऊन गोर- गरीब मुलांसोबत एक दिवस घालून त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. या गरीब मुलांना गोड -धोड व फटाके वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावलंय या मुळे सम्राट सुरवाडे यांच्या बाबत मोठी आपुलकीची भावना नागरिकांमध्ये चर्चेस आलीये. 

"मी एक वाचमन चा मुलगा असून गरिबी काय असते ते मी अगदी जवळून पहिली आहे. आज या मुलांकडे पाहिल्यावर मला माझे बाल पनीचे दिवस आठवतात, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या संदेशा प्रमाणे देव इतरत्र कुठेही नसूम तो माणसात आहे तर या जगाच्या पाठीवर मी कुठलीही जात, पंथ भेद मानत नसून केवळ माणुसकी जाणतो. असे यावेळी सम्राट सुरवाडे बोलत होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow