"नितीन शामकुवर" यांची शिवार श्रमिक बांधकाम व जनरल कामगार संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा - श्रमिक माथाडी व जनरल कामगारांच्या हक्कासाठी नितीन शामकुवर हे गेल्या बऱ्याच वर्षापासून कार्य करत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल म्हणून शिवार श्रमिक बांधकाम व जनरल कामगार संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवार श्रमिक बांधकाम व जनरल कामगार संघटना ही कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात करत आहे.
दिनांक ७ सप्टेंबर रोजी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भूषण उईके, श्री निखिल भीमरावजी सोनवणे सचिव महाराष्ट्र प्रदेश तसेच प्रदेश कार्याध्यक्ष जाकिर शहा यांनी नियुक्तीपत्र देऊन नितीन शामकुवर यांची निवड केली आहे.
शामकुवर यांच्या निवडी ने भंडारा जिल्ह्यातील श्रमिक माथाडी व जनरल कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य निश्चितच होईल असा विश्वास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.भूषण उईके यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?








