माहुली चोर परिसरात वन्य प्राण्यामुळे पिकाचे नुकसान!!

Dec 26, 2025 - 14:54
 0  9
माहुली चोर परिसरात वन्य प्राण्यामुळे पिकाचे नुकसान!!

दैनिक जागर मराठी 


नांदगाव खंडेश्वर (ता. प्र.) :  तालुक्यातील माहुली चोर येथे वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात. नुकसान भरपाई बाबत शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रत वनविभागाचे वडाळी, अमरावती येथील कार्यालयात पोहचून द्यावी लागते. त्यामुळे अर्ज गावातच स्वीकारण्याची व्यवस्था वनविभागाने करावी तसेच शेतकर्यांना योग्य मोबदला द्यावा अशी येथील शेतकर्याची मागणी आहे. माहुली चोर गावाचे पूर्व – पश्चीम भागाला वन विभागाच्या मालकीचे बाभूळबन तसेच जळू नदी आहे. वनविभागाच्या या बाभूळबनात रोही, हरीण, डुक्कर, माकडे या वन्य प्राण्यांचा वावर आहे. दिवसा माकडे तर रात्रीला रोही, हरीण, डुक्कर हे प्राणी शेतकर्याच्या शेतात जावून पिक खातात तसेच नासाडी करतात. या प्राण्यान पासून पिकाचे रक्षणा करिता बरेच शेतकरी या थंडीच्या दिवसात रात्रीला सुद्धा शेतात मुक्कामी असतात. तरी सुद्धा प्राणी नुकसान करतातच.    वन्यप्राण्यान पासून पिकाच्या नुकसानी बाबत वनविभागा कडे तक्रार केल्यास मिळणारी मदत अत्यंत अल्प असते. तरी या बाबत वनविभागाणे नुकसनी बाबत योग्य मोबदला देवून वन्य प्राण्यानचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा तसेच शेतकर्यांना तक्रारअर्ज करणे सोयीचे होण्याकरीता अर्ज गावातच स्वीकारण्याची व्यवस्था करावी या बाबतची मागणी येथील ग्रा.प. सदस्य निखील चोरे, रोषण पवार याचेसह अंकुश कोल्हे, अक्षय पवार, विशाल राऊत, राहुल डोंगरे, संदीप जगताप, अनंत तिखीले, सौरव सुरोसे, भूषण साव, मनीष देठे, निखील डोंगरे या शेतकर्यांनी वनविभागाकडे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow