Health Tips : लिव्हर वाढणे हे गंभीर आजाराचं लक्षण; चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा.

Jan 12, 2024 - 09:20
 0  37
Health Tips : लिव्हर वाढणे हे गंभीर आजाराचं लक्षण; चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा.

Health Tips : बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकदा लोकांना यकृत (Liver) वाढण्याची समस्या भेडसावते. मात्र, या संदर्भात अद्यापही लोकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे, या ठिकाणी आपण यकृत (लिव्हर) मोठं होण्याचा आजार नेमका काय आहे? आणि यकृत वाढल्यामुळे कोणत्या आजाराचा धोका निर्माण होतो? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.   

यकृत हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. आपलं यकृत जर बरोबर असेल तर आपली पचनसंस्था निरोगी राहते. बहुतेक लोकांमध्ये, चुकीचा आहार घेतल्याने आणि दूषित पाणी प्यायल्याने यकृतावर परिणाम होतो. काही वेळा मद्यपान केल्यानेही यकृत खराब होते. हिपॅटायटीस बी हा देखील यकृताचा असाच गंभीर आजार आहे. प्रतिबंध आणि वेळेवर उपचारांसाठी फक्त ही लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. यकृताच्या या 6 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. 

सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो  

यकृताची लागण होताच हिपॅटायटीस हा एक सामान्य आजार आहे. यामध्ये यकृताला सूज येते. तसेच, या आजारात सौम्य तापासारखी लक्षणे दिसू शकतात. तापमान वाढीबरोबरच थकवा, डोकेदुखी आणि सांधेदुखीचाही त्रास होऊ शकतो. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, ताप इतर अनेक कारणांमुळे येऊ शकतो याचा अर्थ हिपॅटायटीस बी असा होत नाही.

लघवीचा रंग गडद पिवळा असू शकतो

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या लोकांच्या लघवीचा रंग गडद पिवळा असू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

उलट्या होणे आणि भूक न लागणे 

हिपॅटायटीस बी ची लागण झालेले लोकांच्या यकृतामध्ये सूज दिसून येते. यकृत नीट कार्य करू शकत नाही. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे दिसू शकतात. यामध्ये उलट्या होणे, भूक न लागणे, चक्कर येणे यांचा समावेश होतो. 

शरीराचा रंग पिवळा होऊ शकतो

जळजळ आणि इतर संक्रमणांमुळे बिलीरुबिन वाढते. त्यामुळे कावीळ होते. बिलीरुबिन हे रक्तातील एक रसायन आहे ज्यामुळे त्वचा पिवळी होऊ शकते. त्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. हिपॅटायटीस बी आणि कावीळ यांच्यातील फरक ओळखण्यासाठी तुम्ही टेस्ट करू शकता. 

वजन कमी होणे, पोटदुखीचा त्रास

यकृताला जास्त संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम पोटावर देखील दिसतो. जर तुमच्या लिव्हरवर परिणाम झाला तर तुम्हाला भूक लागत नाही. वजन लवकर कमी होतं. तसेच, पोटात देखील दुखू लागतं. अशी लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा. आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow