पुंडा येथे आजपासून श्रीराम कथा महोत्सव ...

Apr 25, 2025 - 14:06
Apr 25, 2025 - 14:22
 0  100
पुंडा येथे आजपासून श्रीराम कथा महोत्सव ...
पुंडा येथे आजपासून श्रीराम कथा महोत्सव ...

कथावाचक गोभक्त रामयणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर 

अकोट - पुंडा येथे श्री नंदी महादेव संस्थान व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा प्रांगणात आज दुपारी 4 ला तीर्थ स्थापना करून संध्याकाळी 7 वाजता पासून श्रीराम कथा महोत्सवाची सुरुवात होणार आहे. श्रीराम कथानिरूपण विदर्भरत्न महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, गोभक्त, रामयणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांच्या सुमधुर वाणीतून कथा महोत्सव संपन्न होणार आहे. 

तालुक्यातील पुंडा येथे आज दुपारी 4 वाजता श्री नंदी महादेव संस्थान पुंडा नंदीग्राम येथे तीर्थ स्थापना व गोमाता पुजन करून संध्याकाळी 5 वाजता गावातून ग्रंथ दिंडी निघणार आहे. तर संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत महाराष्ट्र शासन विदर्भरत्न पुरस्कार प्राप्त, गोभक्त, रामयणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांच्या सुमधुर वाणीतुन 25 एफ्रिल ते 1 मे पर्यंत श्रीराम कथेचे निरूपण होणार आहे. तर 2 मे ला हभप संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. या सात दिवसांमध्ये पुंडा येथील सांप्रदायिक भजन मंडळी हे सकाळी 5 ते 6 काकडा आरती, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठाचे नियोजन राहणार आहे, तर 7 ते 10 श्रीराम कथा निरूपण आयोजित केले आहे. सदर श्रीराम कथा ही श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. कथा महोत्सव श्री विठ्ठल आश्रम धोतर्डी येथील हभप सदानंद महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. कथा श्रवण करण्यासाठी परिसरातील श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री नंदी महादेव संस्थानचे विश्वस्त शशिधरराव उपाख्य दादासाहेब खोटरे तथा समस्त गावकरी मंडळी पुंडा यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow