हेच तर खरं प्रेम! चहलने धोनीचा कॅच घेताच आरजे महावशचा आनंद गगनात मावेना, उड्या मारत दिली रिॲक्शन !!

Apr 9, 2025 - 09:33
 0  21
हेच तर खरं प्रेम! चहलने धोनीचा कॅच घेताच आरजे महावशचा आनंद गगनात मावेना, उड्या मारत दिली रिॲक्शन !!

मुंबई - आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आजकाल त्याच्या खेळापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. चहल आणि धनश्रीचं लग्न २०२० मध्ये झालं, पण त्यांचं नाते पाच वर्षांतच संपुष्टात आलं. घटस्फोटानंतर चहलबद्दल असं म्हटलं जात आहे की, तो प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि अभिनेत्री आरजे महावशच्या प्रेमात आहे.

महवश आणि चहल यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान दोघेही एकत्र बसलेले दिसले, तेव्हा ते पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले आणि आता महावश उघडपणे चहलवर तिचं प्रेम दाखवत आहे. आरजे महावश आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला पाठिंबा देण्यासाठी आणि सीएसके विरुद्धचा सामना पाहण्यासाठी न्यू चंदीगडमधील स्टेडियममध्ये पोहोचली होती.

चहलला पाहून महावश आनंदाने उडी मारली

सीएसके विरुद्धच्या सामन्यात चहलने फक्त १ षटक टाकलं ज्यामध्ये त्याने ९ धावा दिल्या. त्याने संघासाठी फिल्डिंगमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. डावाच्या शेवटच्या षटकात, शानदार फलंदाजी करणाऱ्या अनुभवी महेंद्रसिंग धोनीने यश ठाकूरच्या चेंडूवर साईड शॉट खेळला. कर्णधार श्रेयस अय्यरने चहलला लेग साईडवर फिल्डिंगसाठी उभं केलं होतं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow