भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट !!

Oct 5, 2024 - 17:36
 0  26
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट !!

मुंबई : भाजपला घाबरवून २० ते २५ आमदार फोडायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकून महाविकास आघाडी मजबूत करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता. मात्र आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केला.ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow