डीपसीकमुळे ChatGPT ची मक्तेदारी संपुष्टात !!

Jan 30, 2025 - 13:34
 0  69
डीपसीकमुळे ChatGPT ची मक्तेदारी संपुष्टात !!

चीनने डीपसीक (DeepSeek) लॉन्च करुन AI (Artificial Intelligence) विश्वात खळबळ उडवून दिली आहे. जगभरात डीपीसीकची चर्चा होत असताना त्याच्याशी संबंधित वादही समोर येऊ लागले आहेत. डीपसीकला काही यूजर्सनी उइगर मुस्लिमांबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी चीन जो प्रचार करतो, तसच उत्तर दिलं. त्यामुळे डीपसीकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. चीन डीपसीकच्या माध्यमातून आपल्या अजेंड्याचा प्रचार करत असल्याचा आरोप होतोय.

डीपसीक ChatGPT ची स्पर्धक आहे. ChatGPT हे अमेरिकन कंपनी OpenAI च प्रोडक्ट आहे.

वॉइस ऑफ अमेरिकेच्या एका रिपोर्ट्नुसार जेव्हा डीपसीककडे चीनमध्ये उइगर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या वागणुकी संदर्भात विचारण्यात आलं. त्यावर डीपसीकने उत्तर दिलं की, “चीनमध्ये उइगर मुस्लिमांना विकास, धार्मिक विश्वास, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचा पूर्ण अधिकार आहे” वास्तवात स्थिती या उलट आहे. चीनमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ केला जातो. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. काही युजर्सनी असाही दावा केली, डीपसीक उइगर मुस्लिमांच्या प्रश्नावर उत्तर देत नाहीय.

अनेक जाणकार आणि मानव अधिकार संघटनांच म्हणणं आहे की, चीनच्या पश्चिमेला शिनजियांग प्रांतत राहणाऱ्या अल्पसंख्याक उइगर मुस्लिमांचा नरसंहार सुरु आहे. त्यांना मशिदीत जाण्यास आणि अन्य इस्लामिक प्रथांच पालन करण्याची परवानगी नाहीय. एंथ्रोपिक कंपनीने बनवलेल्या AI claude ला चीनमध्ये उइगरांना कशई वागणूक दिली जाते, त्या बद्दल विचारलं, तेव्हा त्याने जबरदस्तीने जन्म नियंत्रण आणि सांस्कृतीक प्रतिबंधाशी संबंधित वादांच विवरण दिलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow