युपीआय पेमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये
युनिफाइड पेमेंट इंटरफेसने (UPI) व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जी-पे, पेटीएम, फोन पे यासारख्या ऍप्सद्वारे पैशांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी ही माहिती आहे. आरबीआयने एक मोठी घोषणा केली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणानंतर सांगितले की, युपीआयद्वारे पेमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. पण हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये करता येणार आहेत.
दरम्यान, युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या व्यवहारांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये नवा उच्चांक गाठला होता. १७.४० लाख कोटी रुपयांचे व्यवहार नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा १७.१६ लाख कोटी इतका होता. नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या हंगामामुळे युपीआयमधून होत असलेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
What's Your Reaction?