अकोट तालुक्यात अतिवृष्टी नदी नाल्याकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान !

Aug 28, 2025 - 23:30
Aug 28, 2025 - 23:34
 0  101
अकोट तालुक्यात अतिवृष्टी नदी नाल्याकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान !
अकोट तालुक्यात अतिवृष्टी नदी नाल्याकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान !

बळीराजा संकटात, तात्काळ पंचनामे करण्याची मागणी...

तालुका प्रतिनिधी 

अकोट - तालुक्यातील सर्व महसूल मंडळात 26 व 27 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 तालुक्यात अनेक ठिकाणी सततधार,धुवाधार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या शेत जमिनीतील पिके पूर्ण पाण्याखाली जाऊन अक्षरशः मातीखाली गेली आहेत. 

वारंवार पडणारा पाऊस आणि त्यातून होणारे पिकाचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाकडून सरसकट मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरातील अनेक लहान-मोठे नदी नाले तुटुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील सावरगाव विटाळी परिसरात पठार नदीच्या काठावरील शेत जमिनीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो शेतकऱ्यांच्या तोंडी आलेल्या घास पावसामुळे निघून गेला आहे.

प्रत्येक वेळी निसर्गाचा कोप आणि सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

8 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाचे पंचनामे फक्त नदीकाठच्या शेतकऱ्यांचीच करण्यात आल्या असल्याचे शेतकरी वर्गात चर्चा आहे.

त्यामुळे अशा थातूरमातूर नुकसान भरपाई वर शेतकऱ्यांची बोळवण न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

काल ढगफुटी सारखा पाऊस पडला त्या मुळे पठार नदीला आलेल्या पुरामुळे सावरगाव येथिल शेतकरी भारत वडतकर, रामचंद्र नारे,अमोल वडतकर, माणिक नारे,रमजान शाह, मंगेश नारे, हरिदास पंजाबराव नारे, अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून पुर गेला अक्षरशः कपाशीचे पिक दिसत नव्हते, पुरामुळे खाली झोपून गेली आहे. अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जवळपास कोणाचे पाच एक्कर कोणाचे तीन एक्कर असे भरपूर नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करावी अन्यथा आम्ही सर्व सावरगाव येथील शेतकरी उग्र आंदोलन करू

शुभम पाटील नारे प्रहार तालुका संघटक

माझी तीन एक्कर कपाशीचा खर्च जवळपास 80 हजार रुपये झालेला आहे. बुधवारच्या पावसाने पुर्ण शेतातील पराटी जमीनदोस्त झालेली आहे. त्यामूळ आता हे पराटी सरळ होणे सुध्दा कठीण आहे अजून पर्यंत सुध्दा शेतातील पाणी पुर्ण पने आटलेले नाही.

रामचंद्र नारे, शेतकरी, सावरगाव 

माझी सहा एक्कर पराटी कालच्या पावसाने पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे.खर्च एक ते दीड लाख रुपये लागलेला आहे.अजून सुध्दा शेतातील पाणी पुर्ण पने आटलेले नाही व 20 पाईप दाहा हजार रुपये चे हे सुध्दा वाहून गेलेले आहे.असा एकूण खर्च जवळपास दोन लाख रुपये पर्यंत नुकसान झाले आहे.आता या पराटी पासुन कसलीच आशा रहलेली नाही, तरी त्वरित आम्हला मदत करण्यात यावी.

भारत वडतकर, शेतकरी,सावरगाव.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow