निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला खिंडार! 500 कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा !!
जिल्हा प्रतिनीधी
अकोला - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. या प्रक्रियेत मात्र अनेक इच्छुक उमेदवारांना संधी दिली जात नाही, तर काही ठिकाणी मित्र पक्षासाठी जागा सोडली जात असल्याने महायुती तसेच महाविकास आघाडी पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर येत आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे मोठी घडामोड घडत आहे. भाजपचे जवळपास 500 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने मूर्तीजापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठा ताफा नांदेडच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, शनिवारी रात्रीच जवळपास 300 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले होते. त्यानंतर रविवारी मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातील 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे पाठवले आहेत.भाजपच्या दुसऱ्या यादीतही मूर्तीजापूर येथील भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याने भाजप पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. पिंपळे यांचे तिकीट कापत शरद पवार गटातून भाजपमध्ये आलेल्या रवी राठी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
What's Your Reaction?








