अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; कोर्टाने सांगितलं, 'उद्या मृदेह दफन.'
बदलापुरातील नामांकित शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.सोमवारी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
झालं असं की, आरोपी अक्षय शिंदे हा तळोजा तुरुंगात होता. सोमवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता तळोजा तुरूंगातून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस घेऊन जात होते. बदलापूर पोलिसांचे पथक तळोजा तुरुंगात गेल्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर ते तळोजा तुरुंगातून बाहेर पडले.
त्यानंतर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर व्हॅन आल्यानंतर अक्षयने पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मोरेंच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यावेळी पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली आणि यात त्याचा मृत्यू झाला.
मात्र, घटनेनंतर त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. नुकतंच याबद्दल हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश दिले.
What's Your Reaction?








