आकोट व तेल्हारा करांची स्थानिक उमेदवाराची ईच्छा कॅप्टन सुनिल डोबाळे यांच्या रूपात पुर्ण !!

Oct 28, 2024 - 03:40
 0  168
आकोट व तेल्हारा करांची स्थानिक उमेदवाराची ईच्छा कॅप्टन सुनिल डोबाळे यांच्या रूपात पुर्ण !!

मनसेची सहावी यादी जाहीर; अकोट मधुन कॅप्टन सुनील डोबाळे यांना उमेदवारी .

जिल्हा प्रतिनिधी 

अकोला - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहावी यादी जाहीर केली असून, आज ३२ उमेदवारांची घोषणा केली आहे. अकोट विधानसभा मतदार संघातून कॅप्टन सुनील डोबाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कॅप्टन सुनील डोबाळे हे सेवानिवृत्त मिलिट्री ऑफिसर आहेत. त्यांनी जवळपास ३४ वर्ष देश सेवा केली आहे. सुमारे २९ देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेल्हारा तालुक्यात व्ही.सुमित्राज कॅप्टन सीएनजी गॅस प्रोडक्शन प्लांटची सुरुवात करत ज्यामध्ये जवळपास २००० युवकांना नोकरी व १५ ते  १७ हजार लोकांना रोजगाराची संधी व शेतकऱ्यांना एकरी अडीच ते तीन हजार रुपये विना खर्च उत्पन्न देऊन शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने अकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रामाणिक,निष्कलंकित व सुशिक्षित उमेदवार हा मनसेच्या माध्यमातून आकोट मतदार संघाला मिळाला असल्याची  चर्चा आहे. कॅप्टन सुनील डोबाळे हे आरंभ ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत. आरंभ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून गेल्या बऱ्याच वर्षापासून तालुक्यांत दुर्गम,वंचित भागातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम ते अविरत करत आहेत.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना मनसेनेही सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मनसेने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर केले जात असून २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow