वारकरी संप्रदायातील ह.भ.प यांना सरकारने किमान 5000 रुपये मानधन द्यावे - बाळासाहेब आंबेडकर

Feb 26, 2024 - 03:53
 0  50
वारकरी संप्रदायातील ह.भ.प यांना सरकारने किमान 5000 रुपये मानधन द्यावे -  बाळासाहेब आंबेडकर

जिल्हा प्रतिनिधी

अकोला :- आपल्या कीर्तनातून समाजाला जागृत करून योग्य दिशा दाखविण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्रातील सर्व हरिभक्त परायण यांना किमान 5000 रुपये महिना मानधन सुरू करावे अशी मागणी वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख ऍंड.बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला येथे सकल माळी समाजाच्या संवाद मेळाव्यात केली आहे. 
       सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या माळी समाज संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. बाळासाहेब आंबेडकर व प्रा. सौ. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संतोष भाऊ हुशे हे होते. तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ आणि स्वागताध्यक्ष म्हणून ऍंड.संतोष रहाटे होते. प्रास्ताविक जे. पी. राऊत यांनी केले याप्रसंगी सकल माळी समाजातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर, डॉ.वामनराव वानखडे, रामदास खंडारे, सुभाष सातव, सहदेवराव आसोलकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        तसेच माळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा व वारकरी संप्रदायातील हभप यांचाही सत्कार ऍंड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन मनोहर उगले यांनी तर आभार प्रवीण वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातून हजारो माळी समाज बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमोल कलोरे, सुरेश कलोरे, आशिष मांगूळकर, लक्ष्मणराव निखाडे, सुनील बंड, राजेश वाहोकार, गणेश म्हैसने यांनी अथक परिश्रम घेतले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow