“पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तोंड कसे दाखविणार? उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्म्यावर आणले”, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका

Feb 24, 2024 - 17:35
 0  27
“पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तोंड कसे दाखविणार? उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्म्यावर आणले”, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका

यवतमाळ : यवतमाळातच शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची ‘ग्यारंटी’ देऊन पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत शेतीचे उत्पन्न निम्म्यावर आले. देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २८ ला यवतमाळला येऊन शेतकऱ्यांना तोंड कसे दाखवणार आणि दाभडी येथे दिलेले वचन पूर्ण न करण्याबाबत काय उत्तर देणार, असा खोचक प्रश्न शेतकरी वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शहा यांनी विचारला आहे. येथील विश्रामगृहात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow