अकोला, पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे काही आरोपी मोकाट; अमोल मिटकरी याचं मुलगी आणि भावासह ठिय्या आंदोलन !!
अकोला ,
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनसे- राष्ट्रवादीत वाद वाढला आहे. याप्रकरणात कारवाई करण्यास पोलीस हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरींनी केला. तसेच सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी करत अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर मिटकरी यांनी मुलगी आणि भावासोबत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाला असून चार जणांना आज ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत अमोल मिटकरी यांनी मुलगी आणि भावासह आंदोलन सुरू केले केले.या हल्ल्यानंतर कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबले, प्रवक्ते देशपांडे धमक्या देत आहेत. असा संतप्त सवाल यावेळी अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाराच्या पाठबळामुळे काही आरोपी मोकाट फिरतायेत. उर्वरित सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी करत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे या संदर्भात तक्रार करणार आहे. गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी कॉल करूनही पोलीस गांभीर्याने घेत नाहीये. उद्या मला आणि कुटुंबीयांना काही झाल्यास पोलीस जबाबदार असणार आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
What's Your Reaction?








