फेसबुक लाइव्ह करत मुंबईत सी.ए. तरुणाची आत्महत्या, होणाऱ्या पत्नीवर केला ‘हा’ गंभीर आरोप !!
मुंबईतल्या | गोवंडी या ठिकाणी असलेल्या देवनार भागात ३३ वर्षीय सीए संदीप पासवान याने त्याचं आयुष्य ( Mumbai Crime ) संपवलं. संदीपने त्याचं आयुष्य संपवण्यापूर्वी फेसबुक लाइव्ह करत काय घडलं ते लोकांना सांगितलं होतं. संदीप पासवान म्हणाला होता की त्याच्या होणाऱ्या पत्नीकडून त्याची फसवणूक झाली आहे. तसंच तिच्या आई वडिलांनी माझ्यावर खोटे आरोप केले असंही संदीपने फेसबुक लाइव्ह करत सांगितलं. फेसबुक लाइव्ह पाहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली होती. मात्र पोलीस त्याच्या घरी पोहचले तोपर्यंत त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं ( Mumbai Crime ) होतं. १९ सप्टेंबरला ही घटना घडली. संदीप पासवान हा मूळचा झारखंडचा होता. तो गोवंडी या ठिकाणी भाडे तत्त्वावरच्या घरात वास्तव्य करत होता. त्याचं एका तरुणीशी लग्न ठरलं होतं, दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र तरुणीने १२ लाखांहून अधिक रक्कम आपल्याकडून उकळली. तिने आणि तिच्या आई वडिलांनी मारहाण केली, तसंच खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याची धमकी दिली असं संदीपने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
What's Your Reaction?








