शरद पवारांच्या सभेने कोकणातलं वारं फिरलं, अजित पवारांच्या आमदाराचं टेन्शन वाढवलं !!
विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कोकणातही सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी चिपळूण येथे सभा झाल्यानंतर आज सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात पवारांच्या सभेने वारे फिरले आहे. अजितद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना घेरण्यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने कोकणातले वारं फिरलं आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत संकेत थोरल्या पवारांनी दिले आहेत. त्यामुळे या सभेनंतर सत्ताधारी पक्षात असलेल्या आमदार शेखर निकम यांच्या टेन्शन वाढवला आहे. सोमवारी झालेल्या सभेला माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार रमेश कदम, उद्योजिका स्वप्ना यादव आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?








