काका-पुतण्याच्या संघर्षानंतर आता भावा-भावात सामना होणार?

Oct 2, 2024 - 15:41
 0  53
काका-पुतण्याच्या संघर्षानंतर आता भावा-भावात सामना होणार?

बीड विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्याच्या ठिकाणचा महत्त्वाचा मतदारसंघ. बीड लोकसभेपासून ते जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कोणाही एका नेत्याचे वर्चस्व दिसत नाही. जातीय गणिते, पक्षांतरे यामुळे विविध विधानसभा मतदारसंघातील गणिते नेहमी बदलत असतात. बीड विधानसभेत २००९ आणि २०१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (संयुक्त) माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळविला होता. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीला सहा महिने उरले असताना क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळविले. पण २०१९ च्या विधानसभेत मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही. त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्याच तिकीटावर याठिकाणी विजय मिळविला.

यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका-पुतण्या समोर येण्याची चिन्ह असताना क्षीरसागर कुटुंबातील आणखी एक सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर इच्छुक आहेत. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे त्यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाच आमदार असल्यामुळे अजित पवार गटही येथे उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी करू शकतो. अजित पवार गटाचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यानांही जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार निवडून आणण्याचे आव्हान असेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow