'ती' एक चूक अन् हिंजवडी हत्याकांडचा पर्दाफाश; पोलिसांना ड्रायव्हरवर संशय कसा आला?
पुणे: पुण्याच्या हिंजवडी येथे धावत्या मिनीबसला आग लागून त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत बाहेर न पडू शकल्याने चौघांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, ज्याला अपघात म्हटलं जात होतं तो अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचं समोर आलं आणि पुण्यात एकच खळबळ माजली. पोलिसांच्या तपासात या मिनी बसच्या चालकानेच ही आग लावल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला (वय ५६) ताब्यात घेतलं आहे. त्याने याची कबुली दिली असून कर्मचाऱ्यांचा राग आल्याने त्याने ही भयंकर घटना घडवून आणल्याचं सांगितलं.
बुधवारी (१९ मार्च) सकाळच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडी येथे एका मिनी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात मिनी बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर या आगीत अकडलेल्या चार कर्मचाऱ्यांचा तर अक्षरश: कोळसा झाला. या घटनेत गाडीचा चालक आणि पाच जण जखमी झाल्याचीही महिती होती. या आगीचया घटनेने संपूर्ण पुणे हादरुन गेलं होतं. मात्र, जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा त्यांच्यासमोर वेगळीच कहाणी आली. गाडीचा चालक जनार्दनचा दिवाळीचा पगार त्याच्या मालकाने कापला होता. तसेच, गाडीतील काही कर्मचाऱ्यांनी डबा खाऊ दिला नसल्याने त्याला राग आला आणि त्यातून त्याने हे केल्याचं समोर आलं.
What's Your Reaction?








