पुण्यात कंटेनरला धडकून स्विफ्टचा चक्काचूर, बापलेकीसह मामाचा जागीच मृत्यू, आई गंभीर !!

Mar 24, 2025 - 10:36
 0  16
पुण्यात कंटेनरला धडकून स्विफ्टचा चक्काचूर, बापलेकीसह मामाचा जागीच मृत्यू, आई गंभीर !!

पुणे : न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटनेर आणि स्विफ्ट गाडी यांची समोरासमोर धडक (Pune Accident) झाली. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात न्हावरे येथे हा अपघात झाला. रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कंटनेर आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर भीषण धडक (Nhavare Shikrapur Highway) झाली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये बाप लेकीचा समावेश असल्याचे समोर येत आहे. तर तिसरी व्यक्ती हा मुलीचा मामा होता.

कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड (वय ५० वर्ष), गौरी कैलास गायकवाड (वय १८ वर्ष) आणि गणेश महादेव निर्लेकर (वय २५ वर्ष) अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. मुलीची आई दुर्गा कैलास गायकवाड (वय ४५) ही गंभीर जखमी झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow