राऊतांनी चांगले मानसोपचार घ्यावे, गरज पडल्यास उपचाराचा खर्च सरकार करेल - फडणवीस !!
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच संजय राऊतांवर टीका केलीये. यावेळी फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत परत एकदा युती होऊ शकते का?. यावर स्पष्टपणे बोलताना फडणवीसांनी नकार दिला. म्हणजेच काय तर परत कधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भाजपा युती करणार नाहीये. लाडके उपमुख्यमंत्री कोण आहेत, यावर फडणवीस यांनी सांगितले की, दोन्ही लाडके आहेत आणि त्यांचा मी पण लाडका आहे, म्हणून आम्ही तिघेही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत.
यावेळी देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्याबद्दल अत्यंत स्पष्टपणे बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना स्वत: चा तपास करून घेण्याची गरज आहे. आता अनेक चांगले मानसोपचार रूग्णालये सुरू झाली आहेत. जर आवश्यकता असेल तर आम्ही सरकारच्या वतीने सर्व त्याचा खर्च करू. अगदी आवश्यकता पडली तर मला कोणीतरी सांगितले की, सिंगापूरचे मानसोपचार रूग्णालय खूप चांगले आहे तिथेही त्यांना पाठवायचे असेल तर त्याही करिता सगळा खर्च सरकार देईल.आजच मी जाहीर करतो, बजेटमध्येही त्याची तरतूद करतो पण त्यांनी तपास एकदा करून घ्यावा. संजय राऊतांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावेत, असेच थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस हे 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजनमध्ये बोलत होते. नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, सोशल मीडियावरील काही पोस्ट या बांगलादेशातल्या भाषेतून आहेत. आताच त्यावर बोलणे योग्य ठरणार नाहीये. बाकी तपास हा सुरू आहे. हा व्यापक कटाचा भाग असल्याचे संकेत देखील देण्यात आले.
What's Your Reaction?








