काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्लीतील भेटीची गल्लीगल्लीत चर्चा, NCP कार्यकर्त्यांत उत्साह, समीकरणं कशी बदलणार?

Dec 13, 2024 - 10:03
 0  23
काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्लीतील भेटीची गल्लीगल्लीत चर्चा, NCP कार्यकर्त्यांत उत्साह, समीकरणं कशी बदलणार?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संसदेसह देशभरातून त्यांच्यावर गुरुवारी शुभेच्छांचा वर्षाव झाला. शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच सहकुटुंब पवार यांच्या जनपथावरील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तो सर्वांत चर्चेचा विषय ठरला. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दोन पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले.राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी या मताबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनुकूल आणि प्रतिकूल नेते असून काही नेत्यांनी यासाठी चर्चेची द्वारे खुली केली असल्याचेही कळते. दोन्ही पक्ष एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल आणि त्याचा लाभ भविष्यात पक्षाला होईल त्यामुळे मनोमिलन व्हावे, असा प्रबळ मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसत आहे.या भेटीनंतर दोन्ही पक्षांतील खासदार, आमदार यांच्याशी संवाद साधला असता पक्ष एक होणे हे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असल्याचे काहींनी सांगितले तर काहींनी शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर अवहेलना झाल्यानंतर, असे पाऊल उचलणे गैर असल्याचे स्पष्ट केले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow