माहिती अधिकार कायद्यावरील विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे ४ जानेवारीला आयोजन!!
दैनिक जागर मराठी
आर्णी:माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबत कार्यकर्त्यांना कायदेशीर माहिती व सक्षमीकरण मिळावे यासाठी एक दिवसीय विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन 04 जानेवारी 2026 रोजी आर्णी तालुका (जि. यवतमाळ) येथे करण्यात आले आहे.या प्रशिक्षणात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, मुंबई चे अध्यक्ष श्री. सुभाषराव बसवेकर माहिती अधिकार कायदा, नियम, अर्ज प्रक्रिया, अपील पद्धती, तक्रार निवारण, तसेच प्रत्यक्ष कामकाजात कायदा प्रभावीपणे वापरण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.प्रशिक्षण सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत असून उपस्थित कार्यकर्त्यांसाठी चहा–नाश्ता व जेवणाची विशेष सुविधा आयोजकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागींना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येईल.या कार्यक्रमात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, मुंबई यांच्या नवीन सभासद नोंदणीची सुविधाही उपलब्ध असून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे नियोजन सोपे व्हावे म्हणून इच्छुकांनी २० डिसेंबर २०२५ पूर्वी गुगल पे द्वारे नोंदणी करावी, असे आयोजक प्रल्हाद किसनराव इंगळे यांनी सांगितले आहे. (संपर्क : 9960630898)
घोषवाक्य : “कायदा शिका — कायद्याने लढा”
What's Your Reaction?








