आर्णीचे पत्रकार सद्दाम शेख कुटुंबासह पवित्र उमराह यात्रेसाठी रवाना !!

Dec 6, 2025 - 17:07
 0  9
आर्णीचे पत्रकार सद्दाम शेख कुटुंबासह पवित्र उमराह यात्रेसाठी रवाना !!


दैनिक जागर मराठी 

आर्णी प्रतिनिधी : देवा पवार

आर्णी शहरातील परिचित आणि कार्यकर्तृत्वपूर्ण पत्रकार सद्दाम शेख हे दिनांक ५ डिसेंबर रोजी आपल्या पत्नी व दोन मुलींसह पवित्र उमराह (मुस्लिम समाजातील अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा) करण्यासाठी आर्णी येथील बाबा कंबलपोश दर्गाह येथून रवाना झाले.सकाळी राहत्या घरी छोटेखाणीचा कार्यक्रम आयोजन केला होता, व संध्याकाळी पाच सहा वाजता च्यादरम्यान   दर्गाह येथे उपस्थित राहून त्यांनी कुटुंबासह विशेष दुआ केली आणि पुढील संपूर्ण प्रवास सुखकर व स्वीकारला जावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.या शुभ प्रसंगी सद्दाम शेख यांच्या घरी आणि परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कुटुंबीय, नातेवाईक, पत्रकार मित्र तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या यात्रेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.आर्णी तालुक्यातील पहिले मुस्लिम पत्रकार म्हणून उमराहच्या या पवित्र यात्रेला जाण्याचा मान मिळाल्याने या प्रवासाचे महत्त्व आणखी वाढले आहे.सामाजिक कामात सक्रिय सहभाग, लोकांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविणारा स्वभाव आणि नेहमी लोकाभिमुख भूमिका घेणारा पत्रकार म्हणून सद्दाम शेख यांची ओळख आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी स्वतःहून शुभेच्छा देतत्यांचा प्रवास मंगलमय होवो, उमराह कबूल होवो”अशा भावनिक दुआ दिल्या.या यात्रेदरम्यान शेख कुटुंब पवित्र स्थळी धार्मिक विधी पूर्ण करणार असून, आत्मिक शांतता, कुटुंबाचे आरोग्य आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी प्रार्थना करण्याची मनोकामना व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow