नांदेड जिल्ह्यातील माणुसकीला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना !!
दैनिक जागर मराठी
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड : जिल्ह्यातील प्रेमसंबंधाच्या कारणावरून जातीयवादाने पछाडलेल्या काही समाजकंटकांनी सक्षम गौतम ताटे या निरागस युवकाची निर्घृण हत्या केली. गोळीबार करून आणि फरशीने प्राणघातक वार करत एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला ही घटना मानवतेस लज्जास्पद आहे.या दुःखद प्रसंगी आंबेडकरी विचारधारेवर चालणारे भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे, मराठवाडा निरीक्षक अक्षयजी धावारे व नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्निल भोसीकर व त्यांच्या सोबतच मराठवाड्यातील सर्वच जिल्हाप्रमुख व नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले, धीर दिला आणि न्याय मिळवण्यासाठी एकजूट राहण्याचा निर्धार व्यक्त केला.भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांनी कुटुंबीयांशी थेट संवाद साधून सक्षम ताटे यांना न्याय मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले. उद्या संसदेत हा प्रश्न मांडण्याची ग्वाहीही त्यांनी कुटुंबाला दिली. आणि येणाऱ्या 6 दिवसात भाई स्वतः नांदेड येथे येईल अस आश्वासन दिले..जातीय अत्याचाराविरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठीची ही लढाई आपण सर्वांची आहे. सक्षमच्या परिवाराला न्याय मिळेपर्यंत आमची साथ दृढ राहील.भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार - ऍड. भाई चंद्रशेखर आझाद सक्षम ताटे यांच्या कुठूबीयांशी विडिओ कॉल द्वारे तर राष्ट्रीय महासचिव - अशोक भाऊ कांबळे व मराठवाडा निरीक्षक - अक्षय धावारे व नांदेड जिल्हाप्रमुख स्वप्निल भोसीकर यांनी समक्ष साधला संवाद..!
What's Your Reaction?








