शिवीगाळ केल्याचा राग, पुण्यात रुममेटवर जीवघेणा हल्ला, अर्जुनच्या अंगावर महेश धावून गेला अन् !!

Apr 7, 2025 - 10:21
 0  26
शिवीगाळ केल्याचा राग, पुण्यात रुममेटवर जीवघेणा हल्ला, अर्जुनच्या अंगावर महेश धावून गेला अन् !!

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात तरुणाने चाकूने त्याचा गळा चिरला. पुणे जिल्ह्यातील नर्‍हे परिसरात हा खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पवार (रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अर्जुन राय रियांग गंभीर जखमी झाला. सचिन मधुकर खांबल (वय ४०, रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०२४ पासून महेश पवार आणि अर्जुन राय रियांग यांच्यासोबत फिर्यादी सचिन राहतात. अर्जुन आणि सचिन होस्टेलमध्ये हाउसकीपिंगचे काम करतात. महेश पवार त्याच ठिकाणी सुरक्षारक्षकाचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होत असत. अर्जुन महेशला शिवीगाळ करीत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता.चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow