अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार! मंत्री आदिती तटकरेंची माहिती !!

Oct 8, 2024 - 03:50
 0  164
अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार! मंत्री आदिती तटकरेंची माहिती !!

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करणार असून भाऊबीजेनिमित्त त्यांना २००० रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.आदिती तटकरे म्हणाल्या की, "महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow