महाराष्ट्रात NIA-ATS च मोठं जॉईंट ऑपरेशन, कुठे कारवाई केली ??

Oct 5, 2024 - 05:49
 0  35
महाराष्ट्रात NIA-ATS च मोठं जॉईंट ऑपरेशन, कुठे कारवाई केली ??

महाराष्ट्रात NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. NIA आणि ATS ने जॉइंट ऑपरेशन करुन छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यातून काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या तरुणांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा एटीएस आणि NIA ला संशय आहे. NIA आणि ATS ने या तरुणांची चौकशी सुरु केली आहे. NIA ने कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगर, मालेगावमधून काही तरुणांना उचललं होतं. महाराष्ट्रात तीन ठिकाणी अशा प्रकारची कारवाई झाल्याची माहिती आहे. सध्या छापेमारी झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरु आहेत, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागामध्ये ही कारवाई झाल्याची माहिती आहे. देश विरोधी कृत्यात हे तरुण सहभागी असल्याचा संशय आहे. शनिवारी पहाटेपासून एनआयए-एटीएसने ही कारवाई सुरु केलीय. जालना आणि संभाजीनगरमधून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. गांधीनगर जालना येथून 1 जण, छत्रपती संभाजी नगर शहरातील आझाद चौका जवळून एक जण आणि एन सिक्स परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघेही देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow