वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हदगाव तालुक्यात दिवसा ढवळ्या अवैध वृक्षतोड करुन वाहतुक

Feb 29, 2024 - 17:41
 0  27
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हदगाव तालुक्यात दिवसा ढवळ्या अवैध वृक्षतोड करुन वाहतुक

कैलास तलवारे/ हदगाव तालुका प्रतिनिधी

हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करुन वाहतूक होत असुन  याकडे मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी मूग गिळून गप्प का? आहेत असे नागरिकांकडून बोलले जात आहे तसेच तालुक्यात वन्य प्राण्यांने वानर रानडुकरे आधी प्राण्याने धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील हे प्राणी जिविघेनी हल्ला करत आहेत व विविध प्रकारच्या घटना घडल्या जात आहेत त्यामुळे नागरीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात विविध सामाजिक सघटना, कार्यकर्ते, ग्रामपंचायतनी निवेनाद्वारे अर्ज केले परंतु यावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आद्यपही लक्ष दिले नाही सध्या ग्रामीण भागात ऊस तोडणी सुरू असून त्यामधील असणारे रानडुकरे मोकाट अवस्थेत फिरताना दिसून येत असुन नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना तालुक्यात दिसून येते आहेत त्यामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या अवैध वृक्षची तोड दिवसेंदिवस होत असुन ट्रॅक्टर आदी वाहनाने दिवसा ढवळ्या विलीवाट लावली जाते अवैध वृक्षतोड करणाऱ्या माफिया ठेकेदार याच्या सोबत तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांची मिली भगत आहे का ? असे ग्रामीण भागातील नागरिकांकडून बोलले जात आहे तालुक्यावर वनपरिक्षेत्र कार्यालयाला विविध समस्या तक्रार घेऊन गेल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी ,वनपाल वन रक्षक कधीचं कार्यालयात हजर राहत नाहीत असे ही नागरिकांकडून बोलले जात आहे उंठावर बसून बकऱ्या हकलनाऱ्या अधिकारी यांनी तालुक्यावर जातीने लक्ष द्यावे असे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांकडून बोलले जात आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow