बोरगाव (कडू ) येथे विदर्भ भोई समाज युवा संघांचे फलक अनावरण व नामकरण सोहळा

Feb 29, 2024 - 17:40
 0  50
बोरगाव (कडू ) येथे विदर्भ भोई समाज  युवा संघांचे फलक अनावरण व नामकरण सोहळा

ता. प्र. सागर व्यास
पांढरकवडा : केळापूर तालुका येथील बोरगाव कडु येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगांव (कडू) व विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा पांढरकवडा येथील समस्त भोई समाज बांधव  यांच्या संयुक्त विद्यमानाने समाज एकत्रिकरणाच्या अनुषंघाने आज बोरगाव (कडू ) येथे भोई समाजाचे आराध्य महर्षी वाल्मिकी,यांच्या फलकाचे अनावरण व चौकाचा नामकरण सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अमोल भाऊ गुरनुले ओबीसी राष्ट्रीय क्रांती दल (विदर्भ प्रवक्ता ) प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर नेहारे गोंड गवारी समाज तालुका अध्यक्ष,नागेश मोहुर्ले अखिल भारतीय माळी संघटना तालुकाध्यक्ष,अध्यक्ष दिलीप शिवरकर,उपाध्यक्ष पुंडलिक नान्ने,बोरगाव (कडू ) महिला मंडळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकीचे प्रतिमा फलक अनावरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे फित कापून विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाव (कडू) या फलकाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाचे (अध्यक्ष ) श्री.अमोल भाऊ गुरनुले ओबीसी राष्ट्रीय क्रांती दल,समाजाला मार्गदर्शन करून 
आपल्या भोई,कहार,केव्हट, ढिवर समाजावर होत असलेला सामाजिक पिळवणूक,अन्याय थांबविणे,  हक्क, रोजगार, व्यवसाय , मुलांच्या शैक्षणिक व तलावांचा समस्या संदर्भात विचार मांडून,खेड्यामध्ये असलेला भोई समाज आज एकत्र आणण्याची गरज असून आपण या संघर्षाला पाठिंबा दिला पाहिजे,व पुढील कार्यासाठी युवा पुरुष,महिला युवती यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे जाहीर आव्हान त्यांनी समाजाला केले.ह्या भोई समाजामध्ये कोणताही राजनैतिक हस्तक्षेप न करता सर्वांनी तण- मन धनानी कार्य करावे व समाजाला पुढे नेण्याचे व समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या संबंधी बाबींवर मार्मिक अशा शब्दात संबोधीत केले.जय भोई राज, जय शिवाजी,जय संत भीमा भोई ,जय वाल्मिकी असा जयघोष देण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित बोरगाव (कडू )जेष्ठ समाज बांधव श्री. काशीनाथ नान्ने,बंडुजी नान्ने, परशराम नान्ने,विकास नान्ने,नारायणराव शिवरकर,संभुजी शिवरकार,रमेश शिवरकार,चंद्रभान नांन्ने,रामकीसन नांन्ने,वासुदेव नान्ने,कीसन शिवरकार,लक्ष्मण नांन्ने,गणेश नांन्ने तथा बोरगाव (कडू )येथील महिला मंडळी पण उपस्थित होते पांढरकवडा,भोई समाज बांधव निकेतन बावणे श्री.हागोडबुवा देवस्थान समितीचे अध्यक्ष कैलास नान्ने,विदर्भ भोई समाज युवा संघांचे (अध्यक्ष) विशाल करलुके,(उपाध्यक्ष) चेतन नान्ने,सहसचिव अनमोल भनारकर,सदस्य,करण शिवरकर,भारत नान्ने,कुंदन भनारकर,क्रिष्णा नान्ने,शेखर नान्ने,अंकुश करलूके,दिनेश नान्ने, सुनील शिवरकर,शेखर नान्ने, गणेश शिवरकर,लक्ष्मण पारशीवे, अक्षय बावणे,राकेश शिवरकर, देवगण नान्ने,संदीप करलुके, गणेश शिवरकर,मोहन शिवरकर, ई.उपस्थित होते बोरगाव (कडू ) मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी,सदस्य व   मित्रपरिवार, शिवरकर,नांन्ने, करलूके,परिवार तथा उपस्थित बोरगाव (कडू )येथील समस्त भोई,ढिवर,केवट, तसेच इतर समाजाचे समाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow