घोडांबे गावच्या सख्या बहिनी राज्यस्थरावर!!

Nov 2, 2024 - 03:37
Nov 2, 2024 - 03:43
 0  107
घोडांबे गावच्या सख्या बहिनी राज्यस्थरावर!!

दैनिक जागर मराठी वृत्तसेवा

हतगड / प्रतिनिधी / मनोहर जाधव

सुरगाणा | तालुक्यातील घोडांबे येथील सख्या बहिनी राज्यस्तरावर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तसेच क्रिडा व युवक संचलनालय पुणे , नाशिक जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नाशिक , यांच्या मार्फत आयोजित विभाग स्थरीय मैदानी क्रिडा स्पर्धांमध्ये घोडांबे येथील रहिवाशी भरत लक्ष्मण भोये , यांच्या कंन्या रंजीता भोये व योगिनी भोये 4 x 400 मिटर रिले व 4 किमी धावणे (क्रासकंट्री ) तसेच 800 मिटर धावणे या खेळामधून राज्य स्थरावर निवड झाली आहे , भरत लक्ष्मण भोये हे एक शेतकरी वर्गात जन्मलेले पण त्यांना असलेली खेळाविषयी ची आवड त्यांनि त्यांच्या मुलांमध्ये रुजवली आणि त्याचेच फळ म्हणून त्यांच्या मुली आज राज्यस्थरावर गेलेले आहेत , रंजीता भोये हिने आत्तापर्यन्त 3 वेळा राज्यस्थरावर सहभाग घेऊन एक वेळेस रौप्य पदक पटकावले आहे , तसेच योगीनी भोये हिने आत्तापर्यन्त 5 वेळा राज्यस्थरावर सहभाग घेऊन तीन वेळा सुवर्ण पदक व एक वेळा रोप्य पदक घेतलेले आहे अशा यांच्या ह्या दोघ कन्या यांनी त्यांच्या गावाचे नाव व आईवडीलांचे नाव राज्यस्थरावर नेले आहे , त्यांच्या ह्या दोघ मुली माननीय , क्रॉम्रेड जे , पी , गावीत साहेब यांच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत राज्यस्थरीय स्पर्धा या दि. ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत डेरवन जिल्हा रत्नागीरी येथे होत आहेत , त्यांच्या या यशासाठी क्रॉम्रेड जे , पी, गावीत साहेबांना त्यांना राज्यस्थरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ,

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow