देशी गाय ‘राज्य माता’ घोषित, महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय !!

Sep 30, 2024 - 12:22
 0  49
देशी गाय ‘राज्य माता’ घोषित, महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय !!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गायीला राज्य माता- गोमातेचा दर्जा घोषित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आल्याने शिंदे सरकारचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचं मानलं जात आज कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यात देशी गायी घटल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांनी स्वागतही केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow