राजू शेट्टी मनमानी पद्धतीने निर्णय घेतात, कार्यकर्त्यांचा शेट्टींना जोरदार धक्का !!
कोल्हापूर : राजू शेट्टी कधीही कोणालाही विश्वासात घेत नाहीत. कोणताही मोठा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना हे विचारत नाहीत. ते कोणालाही न विचारता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. यामुळे कार्यकर्ते दुखावले जात असून यामुळे चळवळ संपत चाललीय आणि याला सर्वस्वी जबाबदार स्वतः राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टींना राजकारणाची दुकानदारी चालवायचीय हाच त्यांचा खरा चेहरा असून यासाठी ते चळवळीचा वापर करत आहेत. अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टींच्या कारभाराला वैतागून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलय त्यास कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते
स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या साठी लढणारी राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. स्वाभिमानी च्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी अनेक मोठमोठे यशस्वी आंदोलन केली अगदी लोकसभा आणि विधानसभा देखील गाजवली. मात्र गेल्या काही वर्षात या शेतकऱ्यांच्या चळवळीला राजू शेट्टी यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांचे अनेक शिलेदार दूर होत आहेत. सुरुवातीला सदाभाऊ खोत, गेल्या काही महिन्यांपूर्वी रविकांत तुपकर आणि आता कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी देखील स्वाभिमानीला सोडचिट्टी दिली आहे.
What's Your Reaction?








