सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ !!
मुंबई : सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायती संबंधित दोन मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. ३००० वरुन रु. ६०००. तर उपसरंपचाचे मानधन १००० रुपये वरुन २००० रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० ते ८००० पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. ४००० वरुन रु. ८०००. तर उपसरपंचाचे मानधन १५०० वरुन रु. ३००० करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८००० पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन ५००० रु. वरुन १०,००० रु. तर उपसरपंचाचे मानधन २००० रुपये वरुन ४००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
What's Your Reaction?








