श्री संताजी जगनाडे महाराज जयंती सोनोरा येथे उत्साहात!!
दैनिक जागर मराठी
चांदुर रेल्वे : सोनोरा ग्रामपंचायत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ८) रोजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी सरपंच सुरज मेश्राम उपसरपंच विपीन आसोले यांच्या हस्ते दिप प्रज्वलनासह श्री संताजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी महाराजांच्या अभंग रचनेतून समाजाला विज्ञाननिष्ठ शिकवण देऊन संत तुकाराम महाराजांची संप्रदायिक परंपरा जिवंत ठेवण्याचे महान कार्य केल्याचे तेली समाज संघटनेचे अमरावती विभाग अध्यक्ष जितेंद्र ठोंबरे यांनी सांगितले.
त्या वेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,त्या वेळी भाजप माजी तालुका अध्यक्ष रवींद्र उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्या वेळी सुभाष भस्मे, अशोक हटवार, गजानन जुनघरे, नागोरावजी पाटील, सतीश जुनघरे, रवींद्र खरोडे, गोपाल खडसे,व आदी समाज बांधव यांनी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले संचालन व आभार प्रदर्शन रवींद्र उपाध्ये यांनी केले त्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
What's Your Reaction?








