येवलीत निराधारांसाठी आधार मेळावा. आयोजक भागवत देवसरकर यांची माहिती.

Feb 27, 2024 - 17:37
 0  40
येवलीत निराधारांसाठी आधार मेळावा.  आयोजक भागवत देवसरकर यांची माहिती.

कैलास तलवारे /हदगाव 

संजय गांधी निराधार योजना समिती हदगाव तालुक्याच्या वतीने निराधाराना आधार देण्यासाठी "आधार मेळावा" शुक्रवार दि.1 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा.येवली ता. हदगाव येथे आयोजित केला असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
मेळाव्याचे उद्घघाटन माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील करणार असून अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थिती  जिल्हाधिकारी अभिजित राऊत,आमदार माधवराव पाटील जळगावकर,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर,उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार या उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यामध्ये सर्व निराधार वंचित विधवा अपंग व गरजू व पात्र व्यक्तींना  शासन निर्णय, व इतर माहिती देण्यात येणार आहे,योजनेचा लाभ घेण्यासाठी  तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत तात्काळ तिथेच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे,या मेळाव्यास परिसरातील जास्तीत जास्त गरजू लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर,सचिव तथा तहसीलदार विनोद गुंडमवार,सदस्य तथा गटविकास अधिकारी कैलास बळवंत,सदस्य ओम इंदेवार,विशाल परभणकर,सुभाष धरमुरे,जयवंत पाटील, माधवराव कदम,अमोल पाटील रुईकर,प्रा.कोंडीबा वानोले,गजानन मस्के,श्रीहरी काळे यांनी केले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow