संत गजानन महाराजांची कृपा कधी संपत नाही-हभप समाधान महाराज शर्मा श्रींच्या भक्तांनी फुलली सजल विहीर

Feb 27, 2024 - 17:39
 0  47
संत गजानन महाराजांची कृपा कधी संपत नाही-हभप समाधान महाराज शर्मा  श्रींच्या भक्तांनी फुलली सजल विहीर
संत गजानन महाराजांची कृपा कधी संपत नाही-हभप समाधान महाराज शर्मा  श्रींच्या भक्तांनी फुलली सजल विहीर

अकोट ता.प्रतिनिधी

आकोटःश्री संत गजानन महाराज संस्थान सजल विहीर शांतीवन अमृत तीर्थ अकोली जहागीर अकोलखेड येथे गजानन महाराज प्रगटदिन उत्सवासाठी भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून गेला आहे.श्रींचा प्रगट दिन महोत्सव निमित्त सजल विहीर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंगळवारी श्री संत गजानन महाराज यात्रा महोत्सवातील श्रीमद् भागवत कथा तृतीय पुष्प पार पडले. यामध्ये संत गजानन महाराजांची कृपा कधी संपत नाही एखादी गोष्ट संतांनी दिली तर कल्पचा अंत झाला तरी ती संपत नाही संत गजानन महाराजांचा हा जलप्रसाद संपला नाही या विहिरीचे पाणी संपत नाही गजानन महाराजांची महिमा ही अशीच अविरत असून असे कथा विवेचन समाधान महाराज शर्मा यांनी श्रीमद् भागवत कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना केले.शांतीवन अमृततीर्थ सजल विहिरीवर प्रगट दिन उत्सव पार पडत असून समाधान महाराज पुढे बोलताना म्हणाले मनुष्याने कुणावरही जळू नये मेल्यावर आपण जळणारच आहोत त्यामुळे जिवंत जळत जाऊ नका व स्वतःलाही जाळू नका जो जळतो तो दिवा आणि जळते ती वात म्हणून दिव्या समान बना. आई जवळून मिळतात ते संस्कार वडिलांजवळुन मिळते तो प्रताप अतिथी जवळून मिळते ते प्रेम  भक्तीत ईश्वर साधनेने तल्लीन व्हा असे त्यांनी सांगितले

कथेत मराठी राज्यभाषा दिन गौरव 

मराठी भाषा ज्ञान देणारी आहे मराठीतील अभंग काव्य ग्रंथसंपदा ही मोठी आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार मराठी मुळे मोठ्या प्रमाणावर झाला असून मराठी भाषेतील बाराखडीतील अ च्या अज्ञानापासून तर ज्ञ च्या  ज्ञानेश्वरापर्यंत आहे म्हणून मराठी भाषेचा गौरव वाटतो अशा मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्वांना सदिच्छा व्यक्त करूया व मराठी भाषा बोलूया मराठी भाषा जपूया असे गौरवपर कथन समाधान महाराज यांनी मराठी राज्यभाषा दिनाचा कथेत गौरव केला. 

दिंड्या पालख्यांचे आगमन 

संत गजानन महाराज संस्थान शांतीवन अमृत तीर्थ सजल विहीर येथे प्रगट दिन महोत्सवासाठी विविध ठिकाणच्या पालख्यांचे आगमन सुरू झाले असून मंगळवारी पथ्रोट,सर्फापुर,परतवाडा आदी ठिकाणच्या पालख्यांचे आगमन झाल्याने दिंडी पालख्यामुळे विहीर परिसराला पंढरीचे स्वरूप निर्माण होत आहे. या पालख्यामुळे अभंग, गवळण, श्लोक, हरिपाठ, हरी कीर्तनाने भाविक तल्लीन होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow