भाजपाने काही जुगाड करू नये…”, राजभवनाने पारदर्शक भूमिका घेण्याचे ओमर अब्दुल्लांचे आवाहन !!

Oct 8, 2024 - 03:57
 0  19
भाजपाने काही जुगाड करू नये…”, राजभवनाने पारदर्शक भूमिका घेण्याचे ओमर अब्दुल्लांचे आवाहन !!

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल एक दशकानंतर विधानसभा निवडणूक झाली. आज ९० जागांसाठी निकाल जाहीर होत आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सकाळी एएनाय वृत्तसंस्थेशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी भाजपावरही टीका केली.

ओमर अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही विजयी होऊ अशी खात्री वाटते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी जे ठरवले आहे, ते दुपारपर्यंत कळेलच. पण निकालात पारदर्शकता असायला हवी. जमुरीयतमध्ये जे काही होईल, ते पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे. जनतेचा कौल स्वीकारला गेला पाहीजे. जर लोकांचा कौल भाजपाच्या विरोधात असेल तर त्यांनी जुगाड वैगरे केला नाही पाहीजे. राजभवनने कोणताही हस्तक्षेप न करता लोकांचा कौल स्वीकारावा.”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow