पोलीस स्टेशन धर्माबादचे पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर व पी एस आय श्रीमती पवार यांचा महाविद्यालयाच्या वतीन सत्कार!!

Dec 10, 2025 - 14:01
 0  7
पोलीस स्टेशन धर्माबादचे पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर व पी एस आय श्रीमती पवार यांचा महाविद्यालयाच्या वतीन सत्कार!!

दैनिक जागर मराठी 

   नादेंड : स्थानिक लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद आणि पोलीस स्टेशन धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  मिशन पोलीस भरती या  उपक्रमांतर्गत खुली स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला 212 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून ही परीक्षा दिली आहे. धर्माबाद च्या परिसरात पोलीस स्टेशन विभागाने खुली स्पर्धा परीक्षा आयोजित करून असा बौद्धिक उपक्रम घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. याबद्दल धर्माबाद पोलीस स्टेशन आणि त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या उपक्रमांतर्गत घेतलेल्या परीक्षेचे उत्तम नियोजन आणि आयोजन केल्याबद्दल धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सदाशिवराव भडीकर आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रियंका पवार मॅडम यांचे महाविद्यालयात बोलावून महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कमलाकर कनसे यांच्या हस्ते त्यांना पुस्तक आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. योगेश जोशी, उपप्राचार्य डॉ. दुर्गाप्रसाद रांदड, डॉ. प्रभाकर जाधव, डॉ. बालाजी श्रीगिरे, सेनगाव येथील डॉ. जोशी तसेच महाविद्यालयाच्या कार्यलयीन अधीक्षक डॉ. रिंकू नक्का, श्रीमती वर्षा मेडेवार, सुरेश भद्रे, रमेश कनकमवार यांची उपस्थिती होती...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow