एकनाथ शिंदेंविरोधात मनसेचा हुकमी एक्का? राज ठाकरे यांनी केले या उमेदवाराचे नाव घोषित !!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचवेळी विविध राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या निवडणुकीत त्रिरंगी, चौरंगी लढत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत होत असताना राज ठाकरे यांचा मनसे पक्षही पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली होती. आता सोमवारी डोंबिवलीत आल्यावर राज ठाकरे यांनी दोन नावे जाहीर केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गडात मनसेचा हुकमी एक्का म्हणून समजले जाणारे अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी येथून निवडणूक लढवतात. त्यावेळी मनसे ठाण्यातील उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांचे नाव जाहीर केले. आता अविनाश जाधव ठाण्यातील कोणत्या मतदार संघात उभे राहणार ते मनसेची यादी आल्यावरच स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
डोंबिवलीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मनसेची दुसरी यादी लवकरच जाहीर होईल. यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. परंतु आज मी आलोच आहे तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच येत्या २४ तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फार्म भरण्यासाठी मी येणार आहे. मला आठ वाजता मुंबईत पोहचायचे आहे, त्यामुळे मी आता जास्त काही बोलणार नाही.
What's Your Reaction?








