नागपूर ग्रामीणमध्ये ‘काँटे की टक्कर’, मतदानाचा टक्का सत्तरी पार, बावनकुळेंसमोर मोठं आव्हान !!
नागपूर | ग्रामीण अर्थात रामटेक लोकसभा मतदारसंघांर्तगत येणाऱ्या सहाही मतदारसंघांत ‘काँटे की टक्कर’सारखी स्थिती टक्केवारीवरून दिसून येते. रामटेक आणि उमरेड मतदारसंघाने टक्क्यांची सत्तरी पार करून जिल्ह्यात आघाडी घेतली. त्याखालोखाल काटोल व सावनेर राहिले. हिंगणा सर्वात कमी होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर गृहमतदारसंघासह अन्य ठिकाणीही विजय मिळवण्याचे आव्हान उभे ठाकले होते. उद्या, शनिवारी चित्र स्पष्ट होईल.
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने कामठीतून तब्बल एक दशकानंतर संधी दिली. गेल्यावेळी त्यांचा पत्ता साफ केला होता. ते विधान परिषद सदस्य असतानाही पक्षाने त्यांना मैदानात उतरवले. कामठीत सहा टक्के मतदान वाढले. यावेळी ६४.०५ टक्के तर, गेल्यावेळी ५८.८५ टक्के झाले होते. वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात पडला, यावर मंथन सुरू आहे. काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यासोबत झालेली त्यांची थेट लढत काट्याची ठरली का, अशी चर्चा मतदानावरून सुरू आहे. भोयर यांच्या पाठीशी आक्रमक व्यूहरचना आखणारे माजी मंत्री सुनील केदार राहिले.
What's Your Reaction?








