मतमोजणीची प्रतीक्षा, नियोजन पूर्ण, ७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलिसांच्या बंदोबस्तात निर्णय !!

Nov 22, 2024 - 05:40
 0  36
मतमोजणीची प्रतीक्षा, नियोजन पूर्ण, ७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलिसांच्या बंदोबस्तात निर्णय !!

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर, आता २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागून आहे. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर, आता मुंबईतील मतमोजणी सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेकडून चोख नियोजन केले आहे.
मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी एकूण ३६ केंद्रांवर मतमोजणी होणार असून दोन हजार ७०० हून अधिक कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ मतदारसंघांत ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यामध्ये १०५ उमेदवार मुंबई शहरात, तर ३१५ उमेदवार मुंबई उपनगरातील आहेत. बुधवारी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे संबंधित मतदारसंघाच्या स्ट्रांग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्यासह राखीव पोलिस दल तसेच पोलिस तैनात आहेत. सर्व स्ट्रॉग रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow