गेली २० वर्ष गायब आहे हा अभिनेता, वाट पाहून पत्नीने केलं दुसरं लग्न, सलमानची Ex पैसे उधार घेऊन घेतेय शोध !!

Apr 10, 2025 - 10:02
 0  20
गेली २० वर्ष गायब आहे हा अभिनेता, वाट पाहून पत्नीने केलं दुसरं लग्न, सलमानची Ex पैसे उधार घेऊन घेतेय शोध !!

मुंबई- बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे एकेकाळी लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर होते, पण नंतर ते अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यापैकी काहींनी दुसरा मार्ग निवडला आहे. मात्र एक अभिनेता असा होता ज्याच्याबद्दल आजपर्यंत कोणीही माहिती नाही.

तो अभिनेता होता राज किरण मेहतानी., या अभिनेत्याने 'कागज की नाव' या चित्रपटातून फिल्मइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्याच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमे आहेत. चित्रपटांसोबतच त्याने आखिर कौन आणि आहट यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.राज किरण यांनी १९७० ते १९८० दरम्यान १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काहींचे म्हणणे आहे की त्यांना कालांतराने त्यांना कमी चित्रपट मिळू लागले त्यामुळे ते नैराश्येत गेले. मात्र त्यांचे अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य खूप चांगले होते.

चित्रपटसृष्टीत सक्रिय असतानाच या राज यांनी लग्न झाले. या अभिनेत्याचे पत्नी रूपा आणि त्यांच्या दोन मुलींसह खूप चांगले आयुष्य चालले होते. राजचे कुटुंब अनेकदा प्रकाशझोतापासून दूर राहिले आहे. ते क्वचितच पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसायचे.राजचित्रपट कारकिर्दीतील चढ-उतारांमुळे नैराश्यात गेले, ज्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. अहवालानुसार, १९९४ नंतर राज अचानक गायब झाले. त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सापडले नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow