हक्क भंग समितीच्या नियमात पुनर्रचना निर्माण करण्याची गरज- आ.संजय खोडके!!
दैनिक जागर मराठी
नागपुर : राज्यविधिमंडळ सदस्यांच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन झाल्यास, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृहाने हक्कभंग समिती नेमलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा लोकप्रतिनिधींच्या अवमानबाबत एक सर्क्युलर काढून विशेषाधिकारांचे हनन झाल्यास कार्यवाहीबाबतचे नियम लागू केले. मात्र अजूनही हक्क भंग बाबतच्या अनेक तक्रारी या वर्षनुवर्षे समितीपुढे चालूच राहतात. म्ह्णून अशा प्रकारच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात हक्क भंग समितीच्या अधिकारांच्या नियमात पुर्नरचना निर्माण करण्याची गरज असल्याचा मुद्दा हक्क भंग समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आ. संजय खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या डिसेंबर २०२५ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद सभागृहात सुरु असलेल्या कामकाजात आ. संजय खोडके सहभागी झाले होते. या सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर व आ. श्रीकांत भारतीय यांनी गेल्या २३ नोव्हेंबर रोजी नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
What's Your Reaction?








