लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने बुधवारी दिली.
रामजन्मभूमी चळवळीचे अर्ध्वयू लालकृष्ण अडवाणी सध्या ९६ वर्षांचे आहेत. मात्र ते या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना डिसेंबरमध्येच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र या दोघांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, असे मंदिर ट्रस्टतर्फे सांगण्यात आले होते.
What's Your Reaction?