धर्माबाद येथील ड्रॅगन मार्शल आर्ट च्या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर दबदबा!!

Dec 11, 2025 - 13:48
 0  8
धर्माबाद येथील ड्रॅगन मार्शल आर्ट च्या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर दबदबा!!

दैनिक जागर मराठी 
 
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे १ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड इंडोर हॉल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेतेवार साहेब, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार  साहेब,तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे साहेब यांच्या उपस्थितीत हाप कीडो बॉक्सिंग व जीत कोनाडों जिल्हास्तरीय संघटना यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय हाप कीडो बॉक्सिंग व जित कोनोडो मार्शल आर्ट स्पर्धा दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाल्या त्यात खालील प्रमाणे विविध वजन गटातील विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट असे शास्त्रशुद्धरित्या प्रदर्शन करत कुमते (फाईट) या प्रकारात प्राविण्य मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवत   विभागीय पातळीवर परत एकदा आपलं दबदबा  कायम ठेवून जीत कुणो डो मध्येप्रथम आलेले विद्यार्थी
 वैभवी पांचाळ 22 ते 24 किलो वजन गट 
कार्तिकी कात्रे 30 ते 32 किलो 
दुर्गा हिंगणीकर 34 ते 36 किलो 
तनुजा सूर्यवंशी 36 ते 38 किलो
रागिनी पांचाळ 38 वरील
 पल्लवी टिपरेस्वार 35 ते 37 किलो
मधुमती गलांडे 40 ते 42 किलो 
शुभांगी छत्रे 45 किलोवरील
स्वाती मिसाळे 45 ते 47 किलो 
 सृष्टी सपळे 47 ते 49 किलो 
 दिव्या येवतीवाड 49 ते 51 किलो 
शरयू सीतावार 57 ते 59किलो 
शर्वरी सितावर 61 वरील
 अजिंक्य गलांडे 22  किलो 
रोहन गायकवाड 19 किलो
 शिवराज कपाटे 38 किलोवरील
हाफ किडो बॉक्सिंग
मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी
कार्तिकी कात्रे -33 किलो खालील वजन गट
 दुर्गा हिंगणीकर -36 किलो खालील 
 तनुजा सूर्यवंशी -39किलो खालील
 रागिनी पांचाळ -42किलो खालील
 दिव्या येवतीवाढ -48किलो खालील
सृष्टीचा चपळे -51किलो खालील
शरयू सितावार -57किलो खाली
शर्वरी सितावार -63 किलो खालील वजन गट वरील सर्व विद्यार्थ्यांना
 या खेळात नांदेड जिल्ह्याचे महिला स्वयंसिद्धाचे जिल्हा अध्यक्ष सौ रंजना आढाव मॅडम व शिकाई मार्शल आर्ट चे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत आढाव सर तसेच तालुका क्रीडा संयोजक श्री अहमद लढा सरआणि ड्रॅगन मार्शल आर्टअकॅडमी चे ग्रँडमास्टर श्री दत्तात्रय सीतावार यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या या यशाबद्दल लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर  कणसे सर ,उपप्राचार्य जोशी सर, श्री बालाजी शिरगिरे सर आणि श्री बोधनकर सर तसेच हुतात्मा पानसरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बेंबरेकर सर व सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे कौतुक केले आहे ज्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल एक प्रकारची आवड निर्माण होत आहे.  तसेच सर्व क्रीडाप्रेमींकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow