बापरे! १ घर अन् ५ मृतदेह; वडिलांनी ४ लेकींसह आयुष्य संपवलं; दुर्गंधीमुळे भयंकर घटना उघडकीस!!

Sep 28, 2024 - 03:47
 0  120
बापरे! १ घर अन् ५ मृतदेह; वडिलांनी ४ लेकींसह आयुष्य संपवलं; दुर्गंधीमुळे भयंकर घटना उघडकीस!!

वडिलांनी चार मुलींसह आत्महत्या केल्याची घटना दिल्लीतील रंगपुरी परिसरात घडली आहे. ५० वर्षांचे हिरालाल त्यांच्या कुटुंबासह रंगपुरीत एका घरात भाड्यानं राहत होते. त्यांना चार लेकी होत्या. चौघीही दिव्यांग होत्या. त्यामुळे त्यांना कुठेही जाता यायचं नाही. हिरालाल यांच्या पत्नीचा गेल्याच वर्षी कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे चार लेकींची जबाबदारी हिरालाल यांच्या खांद्यावर होती.हिरालाल यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांच्या शेजारच्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचं दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. दिल्लीतील बुराडीमध्ये जुलै २०१८ मध्ये एकाच कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेनं अख्खा देश हादरला होता. रंगपुरीतील घटनेनं अनेकांना बुरारीची आठवण झाली.शुक्रवारी दिल्लीतील रंगपुरी गावात घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. हिरालाल यांनी त्यांच्या चार लेकींसह विष खाऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. वसंत कुंज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हिरालाल (५० वर्षे), नीतू (१८ वर्षे), निशी (१५ वर्षे), नीरु (१० वर्षे) आणि निधी (८ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावं आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow